‘या’ कंपनीची ई-स्कूटर जानेवारीत होतेय लॉन्च; पहिल्याच वर्षी १० लाख युनिट विक्री करण्याचे लक्ष, महाराष्ट्रात प्लांट येण्याची शक्यता

मुंबई :

अॅपवर टॅक्सी बुकिंगची सेवा देणारी देशांतर्गत कंपनी ओला आता इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीमध्ये काम करणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत कंपनी आपले पहिले ई-स्कूटर बाजारात सादर करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या जवळच्या सूत्रांनी सांगितले की सुरुवातीला हे इलेक्ट्रिक स्कूटर नेदरलँड्सच्या प्लांटमध्ये तयार केले जाईल, त्यानंतर ते भारत आणि युरोपच्या बाजारात विकले जाईल.

नंतर कंपनी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये भाग घेण्यासाठी आणि स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी देशात आपला प्रकल्प स्थापित करण्याच्या विचारात आहे. या वर्षाच्या मे महिन्यात ओला इलेक्ट्रिकने एम्सटर्डम स्थित एटेर्गो  बीव्ही ताब्यात घेण्याची घोषणा केली. त्यानंतर कंपनीने 2021 पर्यंत भारतीय बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी वाहन चालवण्याचे लक्ष्य ठेवले होते. पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत इलेक्ट्रिक स्कूटर एकाच वेळी भारतीय आणि युरोपियन बाजारात आणली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ई-स्कूटरची किंमत देशातील सध्याच्या पेट्रोल स्कूटरशी स्पर्धा करणारी आहे.

२ कोटी टूव्हीलरची विक्री करणाऱ्या बाजारात मोठा वाटा उचलण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. ओलाने पहिल्या वर्षात १० लाख ई-स्कूटरची विक्री करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. ई-स्कूटर बाजारामध्ये ओला ही बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्पसारख्या कंपन्यांशी टक्कर देणार आहे. ओला भारतातील ई-स्कूटर उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी विविध राज्य सरकारांशी चर्चा करीत आहे. असे म्हटले जात आहे की हा देशातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक स्कूटर कारखाना असेल. ओला इलेक्ट्रिक ही कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्य सरकारसह या प्रकल्पासंदर्भात चर्चा करीत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here