‘या’ कंपनीने ऑनलाइन विकल्या २ लाख कार; २ वर्षांपूर्वी सुरु केला होता डिजिटल प्लेटफॉर्म

मुंबई :

मारुती सुझुकी इंडियाने (एमएसआय) ऑनलाइन माध्यमाद्वारे दोन लाखाहून अधिक कारची विक्री केली आहे. कंपनीने सोमवारी सांगितले की, सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म सुरू केले होते. कंपनीच्या या डिजिटल प्लेटफार्मने देशभरात सुमारे 1 हजार डीलरशीप जोडले आहेत.

मारुती सुझुकी इंडियाचे कार्यकारी संचालक(मार्केटिंग एंड सेल्स) शशांक श्रीवास्तव म्हणाले की, वाहन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता. डिजिटल इन्क्वायरीत तिप्पट वाढ झाली आहे. एप्रिल 2019 पासून डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आमच्या विक्रीने दोन लाख युनिट्स ओलांडली आहेत.

श्रीवास्तव यांनी अधिक माहिती सांगताना म्हटले की, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांच्या चौकशीची संख्या 21 लाखांवर पोहोचली आहे. श्रीवास्तव यांनी ‘गुगल ऑटो गियर शिफ्ट इंडिया -२०२०’ रिपोर्टचा हवाला देत म्हटले आहे की, डिजिटल माध्यमांचा नवीन गाड्यांच्या विक्रीच्या ९५% टक्के परिणाम होतो. कारण कोणत्याही ग्राहकांना गाडी खरेदी करण्यापूर्वी ते संपूर्ण माहिती ऑनलाईन मिळवतात आणि त्यानंतरच ग्राहक खरेदी करण्यासाठी येतो.  

ऑनलाईन माध्यमातून ग्राहकाला गाडीबद्दल पूर्ण माहिती मिळते. अखेरीस, ग्राहक विश्वासू डीलर सल्लागाराशी बोलतो. श्रीवास्तव म्हणाले की, आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या ग्राहकांना वाहिनीची माहिती डिजिटल मिळते तो 10 दिवसांच्या आत कार खरेदी करतो.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here