खुशखबर! दोन डोसची किंमत असणार फक्त ‘एवढे’ रुपये; सिरमच्या पुनावालांनी केले स्पष्ट

मुंबई :

कोरोनावर लस कधी येणार याकडे अवघे जग डोळे लावून बसल आहे. अशातच जगातील एक नंबरची लस बनवणारी कंपनी सिरमने खुशखबर दिली आहे. फेब्रुवारीपर्यंत कोरोना लस उपलब्ध होणार असून दोन डोसची किंमतही सांगितली आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी सांगितले की, कोरोना लसीचे २ डोस जनतेला परवडणाऱ्या किंमतीत मिळणार आहे. या २ डोसची किंमत १ हजार रुपये असेल, आतापर्यंत घेतलेल्या चाचणीचे अहवाल सकारात्मक आले असून आता अंतिम चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा केली जात आहे. तर २०२४ पर्यंत संपूर्ण भारतातील नागरिकांना लसीकरण केलं जाईल. भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस टोचण्यासाठी २ ते ३ वर्ष लागू शकतात.

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोरोनाची कोवाशिल्ड लस उपलब्ध होणारआहे, तर सर्वसामान्य जनतेसाठी एप्रिल २०२१ पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान अनेक राज्यांमध्ये कोल्ड स्टोरेजची व्यवस्था पाहिली जात आहे. यासाठी केंद्र सरकारला राज्याकडूनही मदत मिळत आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनसार केंद्राकडून फिरते रिफ्रेजरेटर, कूलर आणि मोठे रेफ्रिजेरेटर याशिवाय 150 डीप फ्रीजरर्सची व्यवस्था केली आहे. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरेटर तयार केले जात आहेत. याशिवाय मेंटेनेसचं कामही केलं जात आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here