57 लाखांचे सोने घेऊन रिक्षा फिरत होती नगरमध्ये; पोलिसांना आला संशय, वाचा पुढे काय घडले

अहमदनगर :

तब्बल एक किलोपेक्षा जास्त सोने घेऊन फिरणारी रिक्षा संशयास्पदरित्या नगर शहरात फिरत होती. पोलिसांना राहून राहून काहीतरी गडबड असल्याचा संशय येत होता. मात्र नेमकं काय आहे, याची चौकशी करण्यासाठी अखेर पोलिसांनी रिक्षा चालकाला हिसका दाखवला. मग झडती घेतली अखेरीस रिक्षात असणाऱ्या 56 लाख 89 हजार 690 रूपये किंमतीचे 1 किलो 368 ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले.

पोलिसांनी सोने आणि रिक्षाचालक दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. रिक्षा चालकाचे नाव फैरोज रफीक पठाण असून त्याने ही सोन्याची बॅग आपल्याला नगर शहरातील याला गंजबाजार परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पठाण विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

रिक्षामध्ये आढळून आलेले सोने ओमप्रकाश वर्मा यांचे असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. न्यायालयातून हे सोने वर्मा यांना देण्यात येईल. वर्मा यांचे गंजबाजारामध्ये सोन्याचे दुकान आहे. त्यांनी पाडव्याच्या दिवशी ग्राहकांना देण्यासाठी हे सोने बॅगमध्ये भरले. ही सोन्याची बॅग दुकानाच्या बाहेर विसरून राहिली. यानंतर रिक्षा चालक फैरोज पठाण याने या बॅगची चोरी केली. यामुळे पठाण विरोधात चोरीचे वाढीव कलम लावले आहे. असे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी म्हटले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here