10 वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती; असा करा अर्ज

मुंबई :

कोरोनाच्या काळात लोकांवर आर्थिक संकट आहे. एका बाजूला हजारोंनी पगार कपात तसेच कर्मचारी कपात केली जात असताना सरकारकडून नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावी पास असणारे सर्वजण या पदांसाठी अर्ज करू शकता. भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर 2020 आहे. 

www.joinindiancoastguard.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता. याविषयी अधिक माहितीही तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल.

पदाचा सविस्तर तपशील :-

पदाचे नाव – नाविक (Domestic Branch) 10th Entry – 01/2021 बॅच

पात्रता – 10th पास

वयाची अट – 18 ते 22 वर्ष

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 30 नोव्हेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 डिसेंबर 2020

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here