झोप पूर्ण होत नसेल तर व्हाल ‘या’ आजारांचे बळी; भोगावे लागतील गंभीर दुष्परिणाम

झोप ही मानवाची सर्वात मोठी गरज आहे. विशेष म्हणजे जे सुख झोपेत  आहे ते इतर कशातच नाही, असेही बडे बडे तत्वज्ञानी मंडळी सांगून गेले  आहेत. कॉलेजवयीन मुलांपासून तर कॉमन मॅन आणि रिटायर्ड झालेल्या   वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत अनेक लोक मनसोक्त, गाढ झोप घेत/भेटत/येत नाही. …साला झोप नाही झाली राव, झोपच येत नाही भो…असे अनेक वाक्य आपण  नेहमीच विविध लोकांच्या तोंडून ऐकत असतो. मात्र हे वाचून तुम्ही हैराण व्हाल की तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.

  1. कमी झोप होत असले तर लैंगिक समस्या वाढतात. परिणामी चिडचिड वाढते मन अशांत होते.
  2. त्वचेसंबंधी समस्या वाढतात. पिंपल्स येणे व इतर त्वचा विकार होऊ शकतात.
  3. उच्च रक्तदाब, मधुमेह, जाडेपणा या समस्यांना निमंत्रण मिळते.
  4. झोप पूर्ण न झाल्यामुळे कॅलरीवाले अन्न खाण्याची तीव्र इच्छा होते. परिणामी लठ्ठपणा वाढतो.

संपादन : संचिता कदम

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here