शुक्रवारपासून पुन्हा कर्फ्यू; पहा कोणत्या शहरात घ्यावा लागला ‘हा’ महत्वाचा निर्णय

करोना विषाणूची भीती संपत असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून अहमदाबाद (गुजरात) शहरात रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

भारतातील करोना आटोक्यात आलेला असून काळजी घेऊन सर्व व्यवहार करण्याचे सांगितले जायला लागले आहे. केंद्र सरकारनेही आता यात लॉकडाऊन करून आणखी काही कार्यवाही न करण्याचे धोरण ठेवले आहे. मात्र, दिवाळी आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पुन्हा एकदा नागरिकांची रेलचेल व्हायला लागल्याने रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

अहमदाबाद येथेही अशाच पद्धतीने रुग्णांची संख्या वाढत असताना परिस्थिती हाताबाहेर न जाण्याच्या काळजीपोटी प्रशासनाने रात्रीचा कर्फ्यू पुन्हा एकदा अनिश्चित कालावधीसाठी लागू केला आहे. शुक्रवारी रात्रीपासून या कार्फ्युला सुरुवात होत आहे. या शहरात आतापर्यंत 46 हजार कोविड 19 रुग्ण सापडले आहेत. येथील सुमारे 100 छोट्या-मोठ्या भागात कंटेनमेंट झोन जाहीर केलेले आहेत. दिल्लीनंतर या शहरात पुन्हा एकदा कर्फ्यू लावण्याच्या निर्णयाकडे प्रशासनाने कार्यवाही केली आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here