‘त्यावेळी’ रान उठवणारे मोदी यावेळी चक्क गप्प; पहा नेमके काय प्रकरण घडले बिहारमध्ये

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या शिक्षण मंत्री डॉ. मेवालाल चौधरी यांना अखेर राजीनामा देऊन पायउतार व्हावे लागले आहे. कृषी विद्यापीठात नोकरभरती घोटाळ्यात आरोपी असलेल्या मेवालाल यांच्या प्रकरणावर त्यावेळी म्हणजे 2017 मध्ये रान उठवणारे भाजप नेते आता यावेळी चक्क गप्प होते.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी 2017 मध्ये मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांचे निकटवर्तीय डॉ. मेवालाल यांच्या भ्रष्टाचार प्रकरणावर राज्य गाजवले होते. नंतर त्यांना त्यामुळे कुलपती पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्याच डॉ. मेवालाल यांना आमदार झाल्यावर नीतिशकुमार यांनी दणक्यात मंत्री करून टाकले. त्यावर मात्र, चाकर शब्दही काढण्याची सद्बुद्धी सुशीलकुमार मोदी यांना सुचली नाही.

राजकारणात आपला तो बाब्या असे समजले जाते. त्याचेच हे द्योतक आहे. कारण, लालूप्रसाद यादव यांच्यासोबत असलेल्या नितीशकुमार यांचा माणूस भ्रष्टाचारी तर, भाजपसमवेत आल्यावर तोच माणूस पावन होत असल्याचे हे उदाहरण आहे. मात्र, माध्यमांनी आणि तेजस्वी यादव यांनी डॉ. मेवालाल यांच्या भ्रष्टाचार प्रकरणासह पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण लावून धरल्याने अखेर भाजपसोबत जाऊन पावन होऊ पाहणाऱ्या डॉ. मेवालाल यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here