म्हणून तासाभरात द्यावा लागला मंत्रीपदाचा राजीनामा; पहा कोणाला बसलाय मोठा झटका

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या डॉ. मेवालाल चौधरी यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. पदभार घेतल्यावर लगोलग तासाभरात त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला आहे.

बिहार राज्यात गुन्हेगार आणि भ्रष्टाचार हीच नेत्यांची खरी ओळख आहे. मात्र, असे असले तरीही मंत्रिमंडळात स्थान देताना हे अवगुण नसतील याकडे तिथेही कटाक्षाने पाहिले जाते. मात्र, नितीशकुमार यांनी त्याकडे दुर्लक्ष करून डॉ. मेवालाल यांना शिक्षण मंत्री हे पद दिले होते.

त्यावरून माध्यमांनी आणि तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडले होते. अखेरीस या दबावामुळे डॉ. मेवालाल यांना पडावातून पायउतार व्हावे लागले आहे. हा नितीशकुमार यांना आणि त्यांच्या जनता दल युनायटेड पार्टीला मोठा झटका मनाला जात आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here