मोठी बातमी : भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २ बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आपण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणार आहोत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यावेळी, माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत कुणीही माझ्या भेटीसाठी येऊ नये, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीचं एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे यांनी दिली होती.

दरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहे. प्रसाद लाड यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. याशिवाय गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, स्वत:ची काळजी घ्या. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करुन घ्यावी’, असं प्रसाद लाड ट्विटरवर म्हणाले आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here