महामार्गावर दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवाच का असतो; वाचा लॉजिकल आणि रंजक माहिती

आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या नेहमी पाहण्यात, वापरात असतात. त्याविषयी आपल्याला अनेक प्रश्न पडतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वेळ मिळाला की फिरत बसने ही भारतीयांची जुनी खोड आहे. तसेच एखाद्या गोष्टीचे मूळ शोधून काढणे हा आमचा धंदा आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या कपड्यांचा रंग निळाच का? शाळेच्या बसचा रंग पिवळाच का? ट्राफिक सिग्नलला ३च रंग का? असे विविध प्रश्न आम्हाला पडले आणि आम्ही त्याची उत्तरे शोधून आपल्या समोर मंडळी (याविषयीचे लेख वाचायचे असतील तर  www.krushirang.com वर वाचा) तर आज आम्ही तुम्हाला महामार्गावर दिशा दाखवणाऱ्या फलकांचा रंग हिरवाच का असतो याविषयी सांगणार आहोत.

आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल मोठमोठ्या हायवेवर असणाऱ्या पाट्या हिरव्याच का असतात. मात्र त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न कुणीच केला नसेल. म्हणूनच आज आम्ही आपल्यासमोर या विषयाची लॉजिकल आणि रंजक माहिती मांडणार आहोत.

हिरवा रंग हा माणसाच्या डोळ्यावर कधीही ताण आणत नाही. दुसरी विशेष बाब म्हणजे हिरवा रंग रात्रीला अगदी सहजपणे दिसतो. त्यावर लिहिलेली माहिती आणि दाखवलेल्या दिशा हे दिसायला सोपी जात. म्हणून रस्त्यावरील फलकाचा हिरवा रंग असतो.

आता तुम्हाला वाटत असेल की हे फक्त भारतातच आहे का?… भारताबाहेरही कित्येक देशांमध्ये फलक हे हिरव्या रंगाचेच असतात. परदेशी सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केला जातो. आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा कारण कुणीतरी म्हटले आहे ना की ज्ञान हे वाटल्याने वाढते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here