भारतीय क्रिकेट टीमच्या कपड्यांचा रंग निळाच का आहे; काय आहे कारण, वाचा रंजक माहिती

भारत आणि क्रिकेट हे न तुटणार समीकरण आहे. जसा सुई-दोरा असतो. दोघांशिवाय एकमेकांना महत्व नाही तसेच भारत-क्रिकेटचेही आहे. भारतात लोक सुट्ट्या घेऊन क्रिकेट बघतात. आयपीएल, २०-२०, वर्ल्ड-कप काहीही असो… आम्ही भारतीय सगळं काही सोडून क्रिकेट बघत बसणार… क्रिकेटशी भारतीयांच इतकं घट्ट नातं आहे म्हणूनच की काय क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडूलकरही भारताचाच आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या नेहमी पाहण्यात, वापरात असतात. त्याविषयी आपल्याला अनेक प्रश्न पडतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण शाळेची बस पहिली असेलच ती नेहमी पिवळी असते. मग ती पिवळ्याच रंगाची का असते असा प्रश्न आपल्याला पडतो.(शाळेची बस पिवळ्या रंगाची याविषयीचा विस्तृत लेख krushirang.comवर वाचा) तसेच भारतीय क्रिकेट टीमच्या कपड्यांचा रंग निळाच का आहे? असाही प्रश्न पडला असेल. मात्र याचे उत्तर शोधण्याचा कुणीही फारसा प्रयत्न केले नाही. म्हणूनच आज आम्ही आपल्याला भारतीय संघाच्या जर्शीचा रंग हा निळा का आहे याविषयी सांगणार आहोत.

१९४७ ला पाकिस्तान वेगळा झाला. धर्माच्या नावाखाली वेगळ्या झालेल्या पाकिस्तानमध्ये आजही अराजकता आहे. पाकिस्तान मध्ये मुस्लिम धर्माला प्राधान्य आहे. आणि मुस्लिम धर्मात हिरव्या रंगाला मानल्या जाते, हिरव्या रंगाला मुस्लिम धर्मात जन्नत चे प्रतीक मानल्या जाते, म्हणून पाकिस्तान सारख्या देशाच्या क्रिकेट संघाच्या जर्शीचा रंग हिरवा आहे.

तसेच भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इथे विविध जातीचे, धर्माचे आणि प्रांताचे लोक गुण्या गोविंदाने नंदू लागले. भारताची ओळख धर्मनिरपेक्ष देश म्हणून होऊ लागली. आजही भारत ती ओळख टिकवून आहे.  निळा रंग हा धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे प्रतीक आहे आणि म्हणूनच भारतात कोणत्याही एका धर्माला महत्व न देता अखंड राष्ट्राला महत्व दिले जाते म्हणून भारतीय संघाच्या जर्शीचा रंग हा निळा आहे.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here