रोहित पवारांचा ‘तो’ फोटो ट्रेंडमध्ये; खड्ड्यातील कार काढली ढकलून बाहेर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तरुण आमदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा एक फोटो सध्या ट्रेंडमध्ये आहे. ज्यामध्ये ते एक ओम्नी कार ढकलून बाहेर काढीत आहेत.

याबाबत नांदेड येथील बालाजी हेंद्रे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, हे आहेत आमदार रोहित पवार कारला धक्का देत आहेत. ही प्रेरणा त्यांना कुठून भेटली? अस सर्वसामान्य राहण्याची..! तर त्यानी राज्यातील एका लोकसभा व विधानसभा मतदारसंघाचे नाव घेतले ओळखा पाहू कोणते आहेत ते.

अहमदनगर शहरामध्ये घरपोहोच किराणा सेवा आणि समवेत २ ते ५० टक्के सूट. सर्वांसाठी ही स्कीम लागू आहे.

अशा पद्धतीने त्यांनी गमतीने हा फोटो शेअर केला आहे. मात्र, त्यामध्ये एक मोठ्या घरातील आमदार मदतीला तत्परतेने कसा पुढे आला एच अधोरेखित झालेले आहे. हा फोटो नेमका कुठला आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, अनेकांना हा फोटो खूप आवडला आहे. त्यामुळे तो शेअर होत आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here