जागतिक मेन्स आणि टाॅयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांचा ‘या’ शिवसेना नेत्याला टोला; ‘त्या’ मर्दांच्या विचारांची घाण…

मुंबई :

आज जागतिक पुरुष दिनानिमित्त समाज माध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव चालू आहे. अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता निशाणा साधला. ‘नॉटी’ असणाऱ्या पुरुषांच्या आचारा-विचारात असणारी घाण साफ करून महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यात मदत करूया.

अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जुंपलेल्या वादात ‘नॉटी’ या शब्दावरून बराच कल्लोळ झाला होता. अखेरीस संजय राऊत यांनी सारवासारव करण्यासाठी मला  ‘नॉटी’ म्हणायचे होते, असे सांगत माघार घेतली. आजही कंगना आणि शिवसेना हा वाद सुरूच आहे. आता त्यात पुन्हा अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे.

नेमकं काय म्हणाल्या मृत फडणवीस :-

आज InternationalMensDay2020 आणि WorldToiletDay2020 आहे. या निमित्ताने सर्व देशभक्त पुरुषांना एका सामान्य महिलेच्या वतीने निवेदन करते की, आपण सगळे एक होऊन वाईट विचार करणाऱ्या काही नाममात्र ‘नॉटी’ असणाऱ्या पुरुषांच्या आचारा-विचारात असणारी घाण साफ करून महाराष्ट्राला स्वच्छ ठेवण्यात मदत करूया.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here