महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या ‘या’ अनोख्या आणि हटके परंपरा; वाचून व्हाल आश्चर्यचकित

महाराष्ट्राला स्वतःचा असा सांस्कृतिक इतिहास आहे. महाराष्ट्रातील माणसे ही इतिहासाला जपणारी आणि इतिहासात रमणारी आहेत. आजवर अनेक प्रथा, परंपराचा वारसा महाराष्ट्र पुढे नेत आहे. आजही महाराष्ट्रात अशा अनेक परंपरा आहेत ज्या मोठ्या उत्साहात साजऱ्या होतात मात्र त्या उत्सवांना, परंपरांना जास्त प्रसिद्ध मिळालेली नाही. आज आम्ही आपल्यासमोर अशाच काही परंपरा घेऊन आलो आहोत.

१) धुळे जिल्ह्यात सुमारे १९० वर्षांपासुनची जुनी आणि अनोखी परंपरा साजरी केली जाते. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावातील युवक मंडळी ही परंपरा साजरी करतात. अतिशय रंजक असणारी ही परंपरा सोंग प्रकारात मोडते. चेहऱ्यावर चढवायचे हे मुखवटे घरी आणुन पाटावर मांडले जातात. अंडे आणि लिंबु वाहुन त्याची पुजा केली जाते आणि त्यानंतर ते चेहऱ्यावर चढवले जातात. वेगवेगळे सोंग घेउन चेहयावर मुखवटे चढवायचे. मेकअप करून वाजत गाजत हे सोंग येथील विठ्ठल मंदिरात आणले जाते. तेथे किर्तन सुरू असते पण त्या किर्तनाला मध्ये काही वेळचा ब्रेक देऊन ५ ते ७ मिनीटे हे सोंग दाखविले जाते. सर्वच पुरूष कलाकार असतात, महिलांच्या वेशातील देखील पुरूष कलाकार असतात. सोंगामध्ये सहभागी कलाकारांच्या प्रत्येक घरातील महिला या कलाकारांना ओवाळतात आणि सोंगाची सांगता होते.

२) दुसरी परंपरा थोडी थरकाप करणारी आहे पण काळजी घेऊन या गोष्टी केल्या जातात. सोलापूर जिल्ह्यात शेटफळ गावात भरणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेत एक अनोखी परंपरा साजरी केली जाते. ज्या जोडप्याला मुलबाळ होत नाही ते या सिध्देश्वराला नवस बोलतात आणि बाळ झालं की हा नवस पुर्ण करावा लागतो. 

असा असतो नवस :-

मुल झालेल्या जोडप्यानं आपलं मुल तेथील सेवाकाजवळ दयायचे, तो ते मुल घेउन मंदीराच्या वर कळसाजवळ जाणार आणि तिथुन ते मुल फेकणार आणि खाली उभ्या असलेल्या जोडप्याने ते मुल आपल्या झोळीत झेलायचे. ही परंपरा साजरी करताना संपूर्ण खबरदारी घेतली जाते. सिद्धेश्वर यात्रा ५ दिवस भरते.

३) नागपूरच्या मारबत परंपरेला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळात कंसाने पाठवलेल्या पुतना ला ठार मारल्यानंतर गावातील नागरिकांनी तिला गावाबाहेर नेउन जाळले होते त्यामुळे त्या गावावरील अरिष्ट टळले. आज नागपुरात साजऱ्या होणाऱ्या या मारबत परंपरेला त्या आख्यायिकेशी जोडुन पाहिल्या जाते.

काळी आणि पिवळी मारबत संपुर्ण शहरात फिरवल्यानंतर गावाबाहेर नेउन तिला जाळण्यात येते असे केल्याने गावावरचे अरिष्ट टळते अशी शहरवासियांची धारणा आहे. या मारबतीची मिरवणुक शहरातुन निघत असतांना जोरजोरात अरिष्ट आणि नको असलेल्या गोष्टींचा नामोल्लेख करून घेउन जा ओ मारबत असे ओरडतात. या काळया आणि पिवळया मारबत सोबत एक बडग्या देखील असतो,

त्याला एखाद्या राजकारण्यासारखे रूप दिले जाते आणि त्यावर महागाई, रोगराई असे नाव लावलेले आपल्याला पहायला मिळतात. मारबत ही परंपरा स्वातंत्र्यपुर्व काळापासुन सुरू आहे जवळजवळ १३० वर्षांपासुन ही परंपरा या नागपुर शहरात साजरी केली जाते. पुर्वी इंग्रजांना चिडवण्याकरता आणि डिवचण्याकरता मारबत या उत्सवाचा उपयोग करून घेण्यात येत असे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here