राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; वाचा, कुठे बरसणार सरी

पुणे :

अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे . दोन दिवसांत हे क्षेत्र पश्‍चिम वायव्य भागाकडे सरकेल असे सांगण्यात आले आहे. यामुळे राज्यातील काही भागांत अंशत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत असले, तरी त्याचा प्रभाव फारसा नसल्याने थंडी कमी झाली आहे असं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. विदर्भातील जवळपास सर्वच भागांत काहीशी थंडी कमी झाली असल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीहून अधिक वाढला आहे.

विदर्भात १७ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मराठवाड्यातही थंडी नसल्याने किमान तापमानात १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात गारवा असला, तरी ढगाळ हवामानामुळे दिवसभर उन्हाचा चटका व रात्री काहीसा गारवा आहे. कोकणातील किमान तापमानात झपाट्याने बदल होत असले, तरी किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग या ठिकाणी हलका पाऊस पडेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here