कुक्कुटपालन शेड बांधताना ‘ही’ घ्या काळजी; वाचा पोल्ट्रीबाबत महत्वाची माहिती

कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्याचा आराखडा आणि नियोजन करावे लागते. कुक्कुटपालन हा व्यवसाय करतानाही अशाच पद्धतीने काटेकोर नियोजन करून पुढे जावे लागते. त्यासाठी सगळ्यात पहिली गरज असते ती शेड बांधण्याची. पैसे उभे करून असे शेड बांधताना काळजी घ्यावी. कारण त्याचेही एक शास्त्र आहे.

सर्वप्रथम पक्ष्यांचे शेड उंच जागेवर आणि पूर्व-पश्चिम दिशेमध्ये असावे. शेडसाठीची जागा ही उंचावर तसेच माळरानावर जिथे लोकवस्ती नसेल व दुसरे पोल्ट्री शेड आसपास नसतील अशा ठिकाणी निवडावी. त्यासाठी अशाच पद्धतीची जागा निवडावी. यात अजिबात हलगर्जीपणा करू नये.

आपल्याला लेअर फार्म करायचा की ब्रॉयलर हे अगोदरच पक्के करा. मांस उत्पादन देणाऱ्या किंवा अंडी देणाऱ्या पक्षासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे शेड उभारावे लागतात. दोन्हीपैकी एक काय करायचे ते निश्चित करूनच नियोजन करा. शेडच्या छताला पांढरा रंग किंवा चुन्याचा मुलामा द्यावा. शेडमध्ये भरपूर हवा खेळती राहील अशी रचना असावी.

आपण उभारीत असलेल्या पोल्ट्री शेडचा पाया जमिनीपासून २-३ फूट उंच असावा. एका पक्षासाठी साधारण जागा १ चौरस फूट ही जागा पुरेशी असते. त्यानुसार लांबी आणि शेडसाठी रुंदी २५-३० फूट ठेवा. एकूण गणित करून जे उत्तर येईल त्यातून शेडच्या एकूण मर्यादेपेक्षा १० टक्के पक्षी कमी ठेवल्यास पक्षांना मोकळी जागा मिळते. त्यांच्या आरोग्यासाठी त्याचा उपयोग होतो.

कोंबड्यांना जास्त उन सहन होत नाही. त्यामुळे शेडच्या सभोवताली वर्षभर हिरवीगार व सावली देणारी अशी झाडे लावावीत. यामुळे तापमानाची त्रीव्रता कमी होईल. तापमान कमी व नियंत्रित करण्यासाठी फॉगर, स्प्रिंकलर, कुलर,एसी यांचा वापर करावा. शेडमध्ये होणारी चोरी किंवा आपत्कालीन घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतल्यास फायदा होतो.

 संपादन व लेखन : माधुरी सचिन चोभे

(क्रमशः)

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here