जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅप्लीन यांचे अखेरचे भाषण; वाचा, त्यांचे प्रभावी विचार

मला माफ करा मी सम्राट बनायचा प्रयत्न करीत नाही, हा माझा व्यवसायही नाही. मी कोणावर राजही करणार नाही, ना मला कोणाला हरवायचे आहे. मला सर्वांची मदत करायची इच्छा आहे. मग ते युवा असो, म्हातारे असो, किंवा गोरे तसेच काळे असो. सर्वांची मदत मला करायची आहे. आपण सर्वांना एकमेकांना आपली मदत करायची आहे. मानवाची वागण्याची पध्दत ही हीच असायला पाहीजे.

आपण सर्वांना एकत्र राहुन आपले दुःख व आनंद साजरे करावे लागतील. ही दुनिया एक विशाल स्टेज आहे. जेथे काही लोक समृध्द तर काही दयाशील आहेत. त्यामुळे एकमेकांचे लक्ष ठेवणे आपली जबाबदारी आहे परंतु आपण आज एकमेकांपासुन भटकलो आहोत.

लोभाने मानवास आतुन बदलून टाकले आहे. एकमेकांच्या इर्शेमूळे जगात जी असमानता आली आहे. त्यामुळे लोक एकमेकांचा राग करत आहेत त्यांचा अहम् जागा झाला आहे जो दुनियेसाठी फार घातक आहे. आज सदाचाराचा नाश होत आहे. यावेळी मी बोलत असतांना कित्येक तरूण, वृध्द, माता बालक समाजाच्या या दुरावस्थेचे बळी पडत आहेत. निरपराधी लोकांना सतावले जात असुन त्यांना तुरूंगात कोंडले जात आहे. ज्यांच्या पर्यंत माझा आवाज पोहोचत आहे त्यांना मी म्हणेल की निराश होऊ नका. तुमच्या सर्व आशांना पल्लवीत करा. एकजुटीने आपणांस ही लढाई जिंकायची आहे. यासाठी मानवतेने आपले शस्त्र उचला. आपल्या चांगल्या मनाने आपल्याला त्यांचे मन जिंकायचे आहे. त्यासोबतच आपली समाजात एक प्रतिष्ठाही निर्माण करायची आहे.

पोलिसवाल्यांनो आपल्या चैनीसाठी आपली लाज विकु नका. समाजातील कंटकांच्या हाती आपला ईमान विकु नका, ज्या समस्या आपल्यावर थोपवल्या गेल्या आहेत त्यास दुर करून आपल्या सुखाच्या सुर्याचा उदय करायचा आहे. आपल्या जिवनाचे निर्णय तुम्ही स्वतःच घ्या. तुम्हाला ठरवायचे आहे की आता नेमके काय करावे तुम्हाला विचार करायचा आहे की आता तुमच्या समोर कोणत्या आशा आहेत.

तुम्ही मानव आहात अन् तुमच्यात माणुसकी जगवा. भांडणे करू नका आपल्या सारख्या लोकांचा राग न करता त्यांना एकत्र घेऊन आपले संघटन तयार करा. गुलाम बनु नका. संत ल्युक यांच्या १७ व्या अध्यायात म्हंटले गेले आहे की ईश्वराचे साम्राज्य मानवाच्या मनातुनच जाते त्यामुळे तुम्ही तुमचे मन खुले करा ते सर्वांसाठी उघडल्यावरच ईश्वर त्यात वास करतो.

आपल्या आनंदास थोडे का होईना साजरे करा त्यामुळे क्लिष्ट आणि असहय जीवनातुन थोडा श्वास घ्यायला जागा मिळेल. या लोकतंत्रात सर्वांना समान हक्काचे जिवन जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपल्या सर्व अधिकारांचा वापर करा. मग तुम्ही सैनिक आहात की कामगार कोणतेही काम करत असाल, एकजुट व्हा. आणि आपल्या बंधुभगिनींच्या समस्या सोडविण्यास सहकार्य करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here