हे प्रेरणादायी विचार वाढवतील तुमचा उत्साह; नक्कीच वाचा

 1. थकलात म्हणुन थांबु नका… तेव्हांच थांबा ज्यावेळी हातुन काही उत्तम कार्य घडेल!
 2. बोलु नका! कृती करा… सांगु नका! दाखवुन द्या.. वचन देऊ नका, सिध्द करा!
 3. माझे आयुष्य माझ्याइतके चांगले कोणी देखील बदलु शकणार नाही.
 4. माझं आयुष्य केवळ मीच बदलु शकतो… माझ्याएवढं चांगलं ते कुणालाही बदलता येणार नाही.
 5. कठोर परिश्रम करा… पण शांततेत… येणारे यश अक्षरशः गोंधळ घालेल.
 6. तुमचा आजचा कठोर संघर्ष… तुमच्या येणाऱ्या उद्याची ताकद वाढवतोय.
 7. आजचे अथक परिश्रम… तुमच्या भविष्यातील तरतुद समजा.
 8. ते हसतायेत माझ्यावर… मी वेगळाय म्हणुन…आणि मला हसु येतय त्यांच्यावर…कि ते सगळेच सारखे आहेत म्हणुन… दृष्टीकोन !
 9. तुमच्याजवळ वेळेची मर्यादा आहे…त्यामुळे दुसर्यासारखे आयुष्य जगुन वेळ व्यर्थ गमावु नका.
 10. काळयाकुट्ठ अंधारातच… तारे लुकलुकतात (चमकतात).
 11. धडपडण्याकरता कायम तयार असावं… यशाची चव तेव्हांच तर चाखता येते…
 12. आयुष्यात भेटणारी सगळी माणसं कुठे “आपलं’’ भविष्य घडवतात… त्यातली मोजकीच आपल्याला जीवन जगण्याची गुरूकिल्ली देऊन जातात…
 13. आयुष्य काय आहे? हे समजण्याकरता मागे पहा…
 14. आयुष्य जगायचय? पुढे पहा!
 15. “आनंद’’ आपल्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here