म्हणून बॉलीवूड हसिनांनी केली ‘त्या’ स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक; पहा कोणाची कुठे आहे इन्व्हेस्टमेंट

बॉलीवूड म्हणजे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांचे महत्वाचे ठिकाण. मात्र, याच ठिकाणी अनेकांची स्वप्न मातीमोल होतात, तर काहींची स्वप्न फुलूनही नंतर पैसे नसल्याने एकूण जीवनाची राखरांगोळी होते. त्याच अनुभवापासून दूर राहण्यासाठी म्हणून आता बॉलीवूडमधील हसिनांनी स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक केली आहे.

पहा कोणत्या अभिनेत्रीने कोणत्या कंपनीत आपले पैसे गुंतावले आहेत.

दीपिका पदुकोन : एक विचारी आणि समंजस अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. वडील टेनिसपटू प्रकाश पदुकोन यांच्या मुलीने स्पेस टेक स्टार्टअप Bellatrix एयरोस्पेस यामध्ये आपली गुंतवणूक केली आहे. इस्त्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला ही कंपनी 2016 पासून तांत्रिक मदत करीत आहे.

आलीया भट्ट : सुप्रसिद्ध निर्माता महेश भट्ट यांची ही कन्या. अनेकांना तिच्या गालावरील खळी हृदयाचा ठेका चुकवणारी दिसली असेल. आलियाने ओमनीचैनल लाइफ रिटेलर Nykaa यामध्ये पैसे गुंतवले आहेत. 2016 मध्ये फाल्गुनी नायर यांनी ही कंपनी सुरू केली आहे.

काजल अग्रवाल : दक्षिणात्य सिनेमाची आणि आता हिंदी सिनेमात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या काजल अग्रवाल हिनेही ऑनलाइन गेमिंग प्लेटफॉर्म Okie Gaming यामध्ये 15 टक्के हिस्सा घेतला आहे. टी त्या कंपनीची संचालक झालेली आहे.

कटरीना कैफ : अनेकांच्या दिलाची धडकन असलेल्या कॅटनेही आपली गुंतवणूक करून भविष्यकाळ सुकर केला आहे. ओमनीचैनल लाइफ रिटेलर Nykaa या कंपनीत गुंतवणूक करतानाच या कंपनीच्या मदतीने आपला वेगळा असा ब्युटी ब्रांड स्थापन करण्याची तयारी केली आहे.

अभिनेत्री एश्वर्या राय-बच्चन : सुप्रसिद्ध सुंदरी आणि बच्चन कुटुंबातील बहु असलेल्या ऐशने एका पर्यावरण आधारित कंपनीत 1 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हवेमधील डाटा आणि त्यावर विश्लेषण असे या कंपनीच्या व्यवसायाचे स्वरूप आहे.

प्रियंका चोपड़ा : देशी गर्ल आणि आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या प्रियांकाने टिंडर या डेटिंग ऐपच्या प्रतिस्पर्धी Bumble कंपनीत पैसे लावले आहेत. ती या या कंपनीत  पार्टनर, एडवाइजर आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता. क. : आपल्याकडे कोणतीही ठोस कल्पना असेल तर आम्ही त्याला साकार करू. कंपनी नोंदणी, ट्रेडमार्क, तंत्रज्ञान सल्ला आणि उद्योग मार्गदर्शन यासाठी आम्हाला ९४२२२१५६५८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. (सल्ला व मार्गदर्शन मोफत नसेल. तसेच कोणता उद्योग करावा यासाठी सल्ला मागायला अजिबात फोन करू नये. व्यवसाय आपण निवडावा. आपली बौद्धिक व आर्थिक क्षमता आणि जोखीम पत्करण्याची तयारी यानुसार व्यवसाय निवडावा. आम्ही त्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन करू.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here