नागराजचा अमिताभ बच्चनसह केलेला पहिला बॉलीवूड सिनेमा कॉपीराईटमुळे रखडला; वाचा, सुप्रीम कोर्टाने का दिली स्थगिती

दिल्ली :

सैराटसारखा जबरदस्त मराठी सिनेमा बनवत नागराज मंजुळे सारखा सुपरहिट दिग्दर्शक आपले नशीब बॉलीवूडमध्ये आजमावून पाहण्यासाठी गेला. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह त्याचा पहिला सिनेमा शूट झाला मात्र त्याच्या प्रदर्शनास आता अडचणी येत आहेत. ‘झुंड’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाच्या शुटींगपासून विविध अडचणी आल्या. अखेरीस शूट संपले. मात्र आता चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे हा चित्रपट रखडला असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटावर यापूर्वीच स्थगिती आणली होती.

‘झुंड’ चित्रपट प्रदर्शित करण्यास दिवाणी कोर्ट आणि तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.  तेलंगणा उच्च न्यायालयाने 19 ऑक्टोबरला आदेश देत भारतासह जगभरात ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या आदेशाला चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेतील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने चित्रपटाचे निर्माते सुपर कॅसेट्सची मागणी फेटाळून लावली. 

सार्वजनिक क्षेत्रात (पब्लिक डोमेन) आधीपासूनच उपलब्ध असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सत्य घटना ‘मालमत्ता’ मानल्या जाऊ शकतात का आणि त्या कॉपीराईट संरक्षणास पात्र ठरु शकतात का? हा भारतातील कॉपीराईट कायद्यासंदर्भात महत्त्वाचा प्रश्न या याचिकेत उपस्थित करण्यात आला होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here