मराठा आरक्षण आणि विजेच्या प्रश्नांवर सध्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत आहे. अशावेळी भाजपने यावर रान उठवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील पाटील यांनीही यावर एक सविस्तर फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
त्यांनी ‘मराठ्यांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कपटी राहिला आहे !’ असे थेट शीर्षक यास दिले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठा बांधवांच्या हितार्थ त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा जी यांनी एका महामंडळाची घोषणा केली असून त्यांच्यासाठी ५० कोटी रुपये केवळ जाहीर केले नाहीत तर त्यांचे वाटपदेखील केले आहे.
आज काँग्रेस पक्षाचे असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते सिद्धरामैया जी यांनी येडीयुरप्पा यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. सिद्धरामैया म्हणाले की, कन्नड आणि मराठी लोकांमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरु असल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांसाठी केलेले कोणतेही काम योग्य ठरणार नाही. सिद्धरामैया यांच्या मते, यामुळे कन्नड लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असे त्यांनी पुढे लिहिले आहे.
- तिथे मिळतेय ‘ओप्पो’वर 17 टक्क्यांपर्यंत दमदार सूट; पहा कुठे मिळेल +10% ऑफरही
- ऑफर : नो कॉस्ट EMI वरही मिळतेय सूट; पहा कुठे होऊ शकतोय HDFC कार्डवर 1500 रुपयांपर्यंत फायदा
- नाविन्यपूर्ण : सफल शेतीचा मूलमंत्र म्हणजे ‘फसल’; मोबाईलवर कळणार पिकाचे आरोग्य..!
- पाकिस्तान जिंदाबाद व मोदी विरोधाचा ‘तो’ व्हिडिओ खोटाच; शेतकरी आंदोलनास बदनाम करण्यासाठी वापर
- ‘त्या’ आठजणांकडे आहे शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व; वाचा, या जिगरबाज मंडळींविषयी माहिती
काँग्रेस पक्षावर कडाडून टीका करताना दादांनी पुढे म्हटले आहे की, सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातदेखील काँग्रेसचा मराठ्यांबद्दल असाच स्वभाव पाहायला मिळाला आहे. आधी सरकारने काही न काही घोळ करून आरक्षणात अडचणी निर्माण केल्या, त्यानंतर सारथीला नुकसान पोहोचवून अण्णासाहेब पाटील महामंडळसुद्धा बरखास्त करून टाकले. काँग्रेस पक्ष भले ही महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकचा, दिल्लीचा असो वा इटलीचा… सर्वच भारत आणि भारतीयांच्या विकासाचे शत्रू आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेता सिद्धरामैया यांच्या या वक्तव्याबद्दल अगदी चिडीचूप मुक्या-बहिऱ्यासारखे पाहत राहतील. यांनी ना कधी मराठा समाजाच्या हिताचा विचार केला आहे आणि ना मराठा समाजासाठी काही चांगली गोष्ट केली आहे. सत्तेची लाचारी… काँग्रेस विचारांनीसुद्धा भ्रष्टाचारी !
संपादन : सचिन पाटील
(स्त्रोत : चंद्रकांत पाटील यांचे फेसबुक पेज)
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव