फेसबुक आणि ट्विटरसारख्या साइट्स आहेत तुमच्या प्रायव्हसीसाठी मोठा धोका; वाचा संपूर्ण विषय

दिल्ली :

आजकाल फेसबुक आणि ट्वीटर वापरत नाही, असा माणूस शोधूनही भेटणे कठीण आहे. तसेच या साईट्समुळे लोकांच्या वैयक्तिक माहितीसाठी धोका असल्याचा आरोप यापूर्वीही झाला होता. अशा कित्येक घटना घडल्या होत्या, जिथे लोकांच्या प्रायव्हसीसाठी मोठा धोका होऊ शकत होता. जर आपण फेसबुकवर सक्रिय असाल आणि आपण इंटरनेटवर कुठेही काहीही करत असाल तर लक्षात घ्या फेसबुक आपली माहिती रेकॉर्ड करीत आहे. फेसबुक ही माहिती आपल्या फायद्यासाठी वापरू शकते. ट्विटर, गुगल आणि फेसबुक एकत्रितपणे विविध लोक, त्यांचे विचार आणि ट्रेंड रोखण्यासाठी सामूहिक सेन्सॉरशिपची रणनीती बनवित आहेत, असे द इकॉनोमिक टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

या सोशल मीडिया कंपन्यांवरील प्लॅटफॉर्मवर कोणी कारवाई केली याबद्दल त्यांच्याकडे माहिती आहे, परंतु ते अमेरिकन सरकारबरोबर ती माहिती शेअर करण्यास तयार नाहीत. मंगळवारी अमेरिकन सिनेटच्या न्यायिक समितीने फेसबुक सीईओ डोर्सी यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती दिली. या दोन कंपन्यांच्या मनोवृत्तीने संतप्त झालेल्या अमेरिकन सिनेटर्सनी म्हटले आहे की सरकार आणि पारंपारिक वृत्त माध्यमांपेक्षा  या कंपन्यांनी स्वत:ला मोठे समजणे सुरू केले आहे.

द इकॉनोमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार सिनेट न्यायालयीन समितीच्या चौकशीदरम्यान लोकप्रतिनिधींचा रोष टाळण्यासाठी दोन्ही सीईओंनी त्यांची धोरणे सुधारण्यासाठी आणि त्यांच्या व्यासपीठावरून दिशाभूल करणार्‍या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here