ऑटो सेक्टरमध्ये धमाका : ‘या’ कंपनीने अवघ्या ३२ दिवसात विकल्या 14 लाख बाइक्स- स्कूटर्स; शेअर मार्केटवर होणार ‘असा’ परिणाम

दिल्ली :

गाव असो किंवा शहर दोन्हीकडे गाड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हिरो कंपनीने मार्केटमध्ये मोठा धमाका केला आहे. उत्सवाचा हंगामात हिरो मोटोकॉर्पने जबरदस्त मोठी विक्री केली आहे. कोरोनाचा संसर्ग, घसरलेली अर्थव्यवस्था असे अनेक संकट असतानाही हिरो मोटोकॉर्प कंपनीने अवघ्या 32 दिवसांत 14 लाख हिरो बाइक्स आणि स्कूटरची विक्री केली. कंपनीच्या स्प्लेंडर आणि एचएफ डिलक्स मॉडेलची 100 सीसीमध्ये चांगली विक्री झाली. ग्लॅमर आणि सुपर स्प्लेंडर यासारखी मॉडेल्सही 125 सीसीमध्ये विकली गेली. त्याच वेळी, 160 सीसी विभागात एक्सट्रिम 160 आर आणि एक्सपल्स बाइक्सला जास्त पसंती देण्यात आली.

हिरोच्या या जबरदस्त विक्रीमुळे गुरुवारी शेअर्स बाजारात हिरोच्या गुंतवणूकदारांची चांदी होऊ शकते. हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) सह, फाइजर (Pfizer), इंटरग्लोब एविएशन (InterGlobe Aviation) और स्पाइसजेट (Spiecjet) हे शेअर्सही तेजीत असण्याची शक्यता आहे. सध्या ऑटो आणि बँक सेक्टरमधील शेअर्स तेजीत आहेत. काल महिंद्रा and महिंद्राच्या शेअर्सने 10.76%ची उसळी घेतली. आता हिरो मोठी उसळी घेण्याची शक्यता आहे. आता हीरोचे गुंतवणूकदारही मालामाल होऊ शकतात.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here