‘या’ कंपनीने लौंच केली स्मार्ट इलेक्ट्रिक किटली; जी होणार फोनवर कंट्रोल, वाचा जबरदस्त फीचर्स

दिल्ली :

स्मार्टफोनप्रमाणेच टीव्हीही स्मार्ट झाले आहेत आणि आता इतर घरगुती उत्पादने व उपकरणेही स्मार्ट होत आहेत. शाओमी या आघाडीच्या कंपनीकडून आता अशा प्रकारची उत्पादने मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये ऑफर्समध्ये आणली जात आहेत. आता कंपनीने एक जबरदस्त  मल्टीफंक्शनल स्मार्ट इलेक्ट्रिक किटली आणली आहे. या इलेक्ट्रिक किटलीमध्ये 10 पावर अजस्टमेंट सेटिंग्जसह अनेक जबरदस्त फीचर्स आहेत.

स्मार्टफोनशिवाय, अनेक घरातील उपकरणेही टेक ब्रँड शाओमीकडून देण्यात येत आहेत आणि आता कंपनीने स्मार्ट इलेक्ट्रिक केटली आणली आहे. शाओमीच्या  MIJIA लाइनअपमध्ये जोडलेले नवीन उत्पादन म्हणजे मिजिया मल्टीफंक्शनल स्मार्ट इलेक्ट्रिक किटली आहे. त्याची किंमत 169 युआन (सुमारे 1,900 रुपये) आहे. सध्या ते 139 युआनमध्ये मिळत आहे.

नवीन MIJIA उत्पादनाचे उद्दीष्ट म्हणजे बर्‍याच पाककृती बनवण्याचा सोपा मार्ग ग्राहकांना देणे आहे. या किटलीत 10 भिन्न पावर अजस्टमेंट सेटिंग्स आहेत आणि 100W स्लो इमलीरिंगपासून ते 1000W हाय-पॉवर हीटिंग पर्यंतचा पर्याय आहे. हे डिव्हाइस अंगभूत प्रोग्राम आणि पाककृतींसह आपल्याला मिळते. ज्यात चहा, सूप आणि इतर विविध खाद्यपदार्थासाठीच्या रेसिपी आधीच टाकलेल्या आहेत. म्हणजेच त्यात बर्‍याच पाककृती सहज बनवता येतात.

शाओमीच्या नवीन स्मार्ट इलेक्ट्रिक किटलीमध्ये तापमान सुमारे 12 तास ठेवता येते. स्मार्ट प्रोडक्ट असल्याने, मल्टीफंक्शनल स्मार्ट इलेक्ट्रिक किटली स्मार्टफोनवरून कंट्रोल केली जाऊ शकते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here