‘या’ देशात होणार नाही पेट्रोल-डिझेल गाड्यांची विक्री; जाणून घ्या तिथल्या सरकारचा पर्यायी प्लॅन

दिल्ली :

आजकाल प्रदूषणाचे तोटे आपल्याला थेट दिसत आहेत. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. अशातच एका प्रगत असणाऱ्या ब्रिटन देशाने 2030 पासून पेट्रोल आणि डिझेलने चालणार्‍या नवीन मोटारींच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनसारख्या देशाने हा निर्णय घेतल्याचे लोकांमधून स्वागत केले जात आहे. सदर निर्णयाची घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केली.

ग्रीन औद्योगिक क्रांतीच्या(ग्रीन इंडस्ट्रियल रिवॉल्यूशन) योजनांचा एक भाग म्हणून बोरिस जॉनसन यांनी ही योजना लोकांसमोर आणली आहे. या क्रांतीमुळे ऊर्जा, वाहतूक आणि तंत्रज्ञानात अडीच लाखांपर्यंत रोजगार निर्माण होतील, असेही पुढे त्यांनी म्हटले आहे. हा निर्णय 2040 मध्ये लागू होणार होता पण परिस्थिती पाहता तेथील सरकारने 2030  मध्येच सदर निर्णय लागू करण्याचे ठरविले आहे. 2030 पर्यंत नवीन पेट्रोल व डिझेल कार व व्हॅनची विक्री बंद होईल असे सरकारचे म्हणणे आहे.

सरकारच्या या निर्णयाबाबत वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2040 पासून पेट्रोल आणि डिझेल कारची विक्री थांबविण्याचा निर्णय महत्वाकांक्षी होता.

काय आहे ब्रिटन सरकारच्या ग्रीन प्लान्समध्ये :-

ब्रिटन सरकारच्या ग्रीन प्लान्समध्ये हाइड्रोजन एनर्जी व कार्बन कैप्चर टेक्नोलॉजीचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, 2030 पासून प्रत्येक ब्रिटन घराला वीजपुरवठा करण्यासाठी पुरेशी पवन ऊर्जा निर्मितीची महत्वाकांक्षा आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या न्यू जनरेशनचा देखील समावेश आहे. युरोपी युनियनमध्ये बाहेर पडल्यावर पर्यावरणपूरक विकासाला वाव देण्याचा पंतप्रधान जॉनसन यांचा प्रयत्न आहे. याशिवाय मध्य आणि उत्तर इंग्लंडमधील संघर्षशील औद्योगिक क्षेत्रातही नवीन नोकर्‍या आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here