मार्चपर्यंत ‘या’ क्षेत्रात होऊ शकते 50000 लोकांची भर्ती; वाचा कोणत्या क्षेत्राचे येणार अच्छे दिन

दिल्ली :

मोबाइल हँडसेट बनविणार्‍या कंपन्या पुढच्या वर्षी मार्चपर्यंत 50,000 लोकांची भरती करू शकतात. प्रॉडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेअंतर्गत, देशांतर्गत आणि विदेशी कंपन्यांना भारतात मैन्युफैक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे (आयसीईए) अध्यक्ष पंकज मोहिंदरू म्हणाले की, आतापासून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत हँडसेट कंपन्या 50000 प्रत्यक्ष कर्मचार्‍यांची भरती करतील. कारखान्यात काम करणारे अनेक कामगार लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर घरी परतले होते. आता हे कामगार मोठ्या शहरात परत येत आहेत. दरम्यान, पीएलआय योजना देखील आली आहे.

उद्योग अंदाजानुसार, डिक्शन टेक्नॉलॉजीज, यूटीएल नियोलिंक्स, लावा इंटरनेशनल, ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोमॅक्सच्या डिसेंबरअखेरपर्यंत २०,००० रोजगार मिळतील. मागील वर्षी झालेल्या भरतीपेक्षा हे रोजगार जास्त आहेत. गेल्या वर्षी पीएलआय योजना नसल्यामुळे नवीन भरती कमी झाल्याचे पंकज मोहिंदरू यांनी सांगितले आहे.

मोहिंद्रू यांनी अधिक माहिती सांगताना म्हटले की, सध्या हँडसेट क्षेत्रात सुमारे 7 लाख लोक काम करतात. गेल्या वर्षी सुमारे 15,000 लोकांची भर्ती करण्यात आली होती. त्यामागचे कारण म्हणजे पीएलआय योजना त्यावेळी तयार केली जात होती. गेल्या महिन्यात सरकारने 10 मोबाइल बनविणार्‍या कंपन्यांच्या अर्जांना मंजुरी दिली आहे. यामध्ये सॅमसंग, फॉक्सकॉनचा होन हई, रायझिंग स्टार आणि विस्ट्रोन, पेगाट्रॉनसारख्या पाच परदेशी कंपन्यांचा समावेश आहे. त्यांना पीएलआय योजनेंतर्गत एकूण 41,000 कोटी रुपयांचे प्रोत्साहन मिळणार आहे. हा लाभ पाच वर्षांच्या कालावधीत उपलब्ध होईल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here