पृथ्वीराज चव्हाणांना इन्कमटॅक्स नोटीस; 10 वर्षांचे विवरण मागितले

राज्याचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने (इन्कमटॅक्स) नोटीस बजावली आहे. मागील 10 वर्षांतील विवरण त्यांना मागण्यात आले असून 21 दिवसांत या नोटिसीला उत्तर द्यायचे आहे.

चव्हाण यांनी सिंंचन श्वेतपत्रिका आणि शिखर बँकेवर प्रशासक नेमून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीला अडचणीत आणले होते. तसेच भाजपचे सर्व मोठे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकूण धोरणावर त्यांनी अभ्यासपूर्ण टीका केलेली आहे. अशावेळी एकही काँग्रेस नेत्याने किंवा राज्यातील पक्षाच्या धुरिणांनी त्यांच्या पाठिंब्याचे वक्तव्य केलेले नाही.

सत्तेचा वापर कसा करायचा? तो कोणासाठी करायचा? याबाबत भाजप सरकारांनी नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळे भाजप सरकारांचे काम सुरू असते असे ते म्हणाले. आपण आयकर विभागाच्या या नोटिसीला योग्य ते स्पष्टीकरण लवकरच देणार आहोत, असे चव्हाण यांनी कराड येथून बोलताना ‘दिव्य मराठी’ला सांगितले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here