‘त्या’ बँकेकडून आपल्या ग्राहकांना ‘Alert’ जारी; वाचा, काय म्हटलेय बँकेने

मुंबई :

आजकाल सायबर चोरांची संख्या वाढत आहे. या सर्व घटनांमध्ये अनेकांना खरे आणि खोटे ओळखता न आल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. एवढेच नाहीतर अनेक शिक्षित लोकही आर्थिक फसवणुकीचे बळी ठरले आहेत. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियानेने आपल्या ग्राहकांना ट्वीटरच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश जारी केला आहे. ‘एसबीआयच्या (SBI) नावे जर तुम्हाला खोटा आणि बनावट ईमेल आला तर त्यास अजिबात उत्तर देऊ नका’, असा अलर्ट बँकेने दिलां आहे.  

‘बँक ग्राहकांना विनंती करत आहे की त्यांनी सोशल मीडियावर अलर्ट राहा. कोणत्याही दिशाभूल आणि बनावट मेसेजद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते’ यामुळे ग्राहकांनी कुठल्याही मेसेजवर आपली खासगी माहिती शेअर करण्याआधी तपासणी करा, असे आवाहन एसबीआयने ट्विट करत केलं आहे.

एसबीआय बँकेच्या नावावर ग्राहकांना बनावट ईमेल पाठवला जात असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या नावे आलेला मेल खरा आही की फसवणुकीसाठी आहे याची खात्री नक्की करून घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे.

कोणत्याही प्रकारच्या बँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा. जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. बँकेने ग्राहकांना सतर्क करण्यासाठी आणखी एक संदेश जारी केला आहे. त्यामध्ये जर तुमच्यासोबत फसवणूक झाली तर तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत पोर्टलवर राज्याचे नाव, लॉगिन आयडी, मोबाइल नंबर आणि ओटीपी अशी माहिती देतस तक्रार नोंदवू शकता, असेही बँककडून सांगण्यात आले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here