चिदंबरम यांनी काँग्रेसबाबत म्हटले ‘हे’; पहा काय वाटते त्यांना पक्षाच्या भविष्याबद्दल

सुप्रसिद्ध अर्थतज्ञ आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचे व्यक्ती असलेल्या काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी दैनिक भास्कर वृत्तपत्राला सविस्तर मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भविष्याबद्दल आणि वर्तमानातील घडामोडी याबाबत मत मांडले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावर भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस व्यतिरिक्त अन्य काेणता पक्ष नाही. बाकी सर्व पक्ष प्रादेशिक आहेत. राहुल गांधी यांनी गांधी परिवाराशी संबंध नसलेल्या व्यक्तीस अध्यक्षपदासाठी प्राथमिकता देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करेल हे आता सांगता येणार नाही.

त्यांनी या मुलाखतीत मांडलेले मुद्दे असे :

  1. काँग्रेस पक्षाला भाजपशी लढताना कसून तयारी करावी लागेल. काँग्रेसमध्ये अंतर्गत लाेकशाही पद्धतीने राजनीती अधिक मजबूत होईल.
  2. पंचायतपासून ते ब्लॉक स्तरापर्यंत पक्षाचे आत्मचिंतन झाले पाहिजे. कारण, पक्षाचा खालच्या स्तरावरील जनाधार बाधित झालेला आहे.
  3.  काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्ष हे पद कोणालाही मिळू शकते. वर्किंग कमिटीत यावर निर्णय घेऊन पुढील प्रक्रिया पार पडली जाईल.
  4. बिहारमध्ये पक्षाने केवळ ४५ उमेदवारच रिंगणात उतरवायला हवे होते. कारण, लढलेल्या २५ जागा अशा होत्या, ज्यांवर गेल्या २० वर्षांपासून भाजप किंवा त्यांना सहकार्य करणारे जिंकत आहेत.
  5. पक्षाला आणखी तळागाळापर्यंत पोहोचून आघाडी मजबूत करावी लागेल. जमिनीशी पकड चांगली असली तर अनेक लहान पक्षसुद्धा यश मिळवू शकतात.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here