मध्यप्रदेशमध्ये स्थापन झाले गौ-कॅबिनेट; अशा पद्धतीने ‘क्रांतिकारी’ निर्णय घेणारे पहिले राज्य

उत्तर भारतीय पट्ट्यात धर्म आणि जातीयवाद यांच्यातील तेढ दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे. तिथे धार्मिक कारणाने सहजपणे कोणत्याही व्यक्तीचा जीव जाण्याच्या घटना वाढत आहेत. अशावेळी असे प्रश्न आणि बेरोजगारी हे मुद्दे निकाली काढून थेट गौ-कॅबिनेट स्थापन करण्याचा ‘क्रांतिकारी’ निर्णय मध्यप्रदेश सरकारने घेतला आहे.

याद्वारे शेतकऱ्यांना मदत म्हणून दुग्धविकास करण्याच्या कोणत्या स्कीम राबवल्या जातात याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. कारण, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पशुपालन, वन, पंचायत आणि ग्रामीण विकास, राजस्व, गृह आणि शेतकरी कल्याण विभाग गौ-कॅबिनेटमध्ये सामिल केलेले आहेत.

या गौ-कॅबिनेटची पहिली बैठक गोपाष्टमीच्या दिवशी 22 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता गौ-अभ्यारण सालरिया आगर-मालवा इथे होत आहे. देशातील पहिली गौ-कॅबिनेट मध्यप्रदेश सरकारने स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे धार्मिक कार्यकर्ते व नेत्यांनी स्वागत केले आहे. गायींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी असा निर्णय सरकारने घेतला आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here