असा बनवा केळीचा सूजी हलवा; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजवर आपण विविध प्रकारचे चवदार हलवे खाल्ले असतील. मात्र केळीचा टेस्ट मे बेस्ट असणारा हलवा खाल्ला नसेल. कमी पदार्थांमध्ये झटकन होणारा हा पदार्थ सगळ्यांना आवडणारा आहे. स्वयंपाकात काहीही न कळणारा पुरुषही ही रेसिपी बनवू शकतो. नक्कीच ट्राय करा तुम्हालाही आवडेल….

साहित्य घ्या की मंडळी…

  1. १ कप रवा
  2. १/४ कप तूप
  3. १/२ कप साखर (चवीनूसार)
  4. १ पिकलेले केळ
  5. १०-१२ केशर कांड्या
  6. ३/४ कप दूध

साहित्य घेतले असे तर वाट कसली बघताय लागा की बनवायला …

  1. प्रथम एका पॅनमध्ये तूप घेउन त्यात ड्राय फ्रूटस परतून घ्या. मग त्यात रवा घेऊन चांगला भाजावा. रवा चांगला भाजला की त्यात केळ कुस्करुन घालणे व पुन्हा परतणे.
  2. मग दूध चांगले गरम करुन घेणे व त्यात घालणे. थोडे दुध वगळून त्यात केशर भिजविणे.
  3. आता झाकण ठेउन एक वाफ काढा. मग त्यात केशर भिजवलेले दुध, साखर घालणे व एकत्र करणे व परत झाकण ठेउन एक वाफ काढणे.
  4. ५ मिनीटानी गॅस बंद करावा. आणि केळीचा सुजी हलवा खाण्यासाठी तय्यार…    

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here