ऊर्जामंत्र्यांवर फडणवीसांनी डागली तोफ; पहा काय म्हटलेय आणि दिलेय दणक्यात उत्तर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती खालावली होती असे सांगून उर्जामंत्री नितीन राउत यांनी वीजबिल माफीवर कोणतेही भाष्य केले नव्हते. हाच धागा पकडून आता फडणविसांनी राउत यांच्यावर तोफ डागली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, उर्जामंत्री राउत हे अभ्यास करत नाहीत किंवा त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे. आता वीजबिलाच्या मुद्द्यावर त्यांना तोंड लपवायची वेळ आल्याने ते चुकीची आकडेवारी सांगत असतील असेच वाटते.

पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी म्हटले की, राज्यातील भाजप सरकारच्या काळात स्टेट युटिलिटी मजबूत झाली होती. याची आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. आताचे सरकार आणि मंत्री अपयश झाकण्यासाठी कधी केंद्राकडे बोट दाखावतात, तर कधी आमच्या मागच्या सरकारकडे बोट दाखवतात.

आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ताकद आणि शक्ती असेल तर वीज बिल माफीची घोषणा करण्याचे आव्हान फडणवीस यांनी दिले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here