असा बनवा ‘पनीर स्पेशल मसाला’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आजवर तुम्ही हॉटेलमध्ये पनीरचे अनेक पदार्थ खाल्ले असतील. त्यापैकी अनेक पदार्थ घरीही बनवायचा प्रयत्न केला असेल. मात्र कधी कधी बनवायचे प्रयत्न फसतात आणि दुसऱ्याच नवीन पदार्थाचा शोध लागतो. म्हणून आज आम्ही आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ ‘पनीर स्पेशल मसाला’ घरी बनवण्यसाठी रेसिपी सांगणार आहोत. वाचा आणि नक्कीच ट्राय करा.

साहित्य घ्या की मंडळी…

 1. २०० ग्रॅम पनीर
 2. 2 मोठे बारीक कापलेले कांदे
 3. 2 टोमॅटोची पेस्ट
 4. 2 हिरव्या मिरच्या
 5. १ टेबलस्पून अदरक लसुन पेस्ट
 6. १ टेबलस्पून भाजलेले बेसन
 7. २-३ तेजपत्ता
 8. 3 लवंग
 9. 3 चक्री फुल
 10. 1 टीस्पून जीरे
 11. 5 काळे मिरे
 12. 2 कप पाणी ,
 13. 2 टेबलस्पून साजूक तूप
 14. 1 टीस्पून हळद पाउडर
 15. 1 टीस्पून धने पाउडर
 16. १ टीस्पून गरम मसाला पाउडर
 17. 1 टीस्पून कस्तुरी मेथी
 18. 1-2 बेडगी मिरचीचे तिखट तुमच्या चवीनुसार
 19. चवीनुसार मीठ

‘पनीर स्पेशल मसाला’ बनवण्याची कृती अगदीच सोपी आहे, सहजासहजी हा पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता.

 1. सगळ्यात आधी पनीर तुमच्या आवडत्या आकारात कापून तळून घेणे.
 2. नंतर एक मोठी कढई घ्या. त्यात दोन चमचे साजूक तुप टाकून गरम करा आणि ह्यात आता सगळे खडे मसाले, हिरव्या मिरच्याचे मोठे तूकडे कापून १ मिनिट परतून भाजून घ्या.
 3. त्यानंतर कांदा परतून घ्या. आता परत अदरक, लसुन, कोथिंबीर पेस्ट टाकून परतून घ्या.
 4. पुढे त्यात हळद, तिखट, धने पावडर, गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या.आता त्यात टोमॅटो पेस्ट टाकून मिक्स करा आणि १ मिनिट शिजवून घ्या.
 5. आता बेसन घालून परतून घ्याआणि त्यात मीठ आणि गरम पाणी घालून २ मिनिटे शिजवून घ्या. मसाला (ग्रेव्ही) आता तयार आहे. त्या मसाल्यात पनीरचे पीसेस टाकून थोड्या वेळ शिजवून घ्या.
 6.  पनीर स्पेशल मसाला(ग्रेव्ही) कोथिंबीर टाकून सजवून घ्या. आणि गरमागरम पनीर स्पेशल मसाला नान,चपाती, पराठ्यासोबत खायला घ्या….

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here