धक्कादायक : प्रशासकीय निष्काळजीपणामुळे चिमुरडीचा बळी; राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया

महापालिका असोत की राज्य व केंद्र सरकारची यंत्रणा. सगळीकडे पगार घेण्यासाठी आणि त्यात वाढीसाठी आंदोलन करणारे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्षात कामचुकार असतात. अपवाद वगळता अशी परिस्थिती आहे. त्याचाच फटका मीरा-भाईंदर येथील एका कुटुंबाला बसला आहे.

येथील एका उड्डाण पुलाखाली शौचालयाच्या टाकीचे झाकण उघडे असल्यामुळे एका चार वर्षीय मुलीचा पडून मृत्यू झाला आहे. मुलीच्या मृत्यूच्या जबाबदार असणाऱ्या ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

अफिफा मुस्तफा अली अन्सारी असे या मृत मुलीचे नाव आहे. शेजारच्या मुलांसोबत ती खेळायला फ्लायओव्हर खाली गेल्यावर उघड्या गटरच्या मेन होलमध्ये पडली. त्यात तिचा मृत्यू झाला. महापालिकेच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी मेनहोलचे झाकण काढून तिथेच दुसऱ्या दिवशी जाळी लावण्याचे काम केले जाणार असताना ही घटना घडल्याचे महापालिका प्रशासनाने पोलिसांना सांगितले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here