नोकरभरती घोटाळ्यातील डॉ. मेवालाल यांना शिक्षण मंत्रिपद; नितीशकुमार अडचणीत

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपने पुन्हा एकदा सत्तासोपान चढण्यात यश मिळाले आहे. नितीशकुमार यांनी पदाची शपथ घेतानाच डॉ. मेवालाल चौधरी यांना शिक्षण मंत्रिपद देऊ केले आहे. मात्र, यापूर्वी नोकरभरती घोटाळ्यातील आरोपी असलेल्या डॉ. मेवालाल यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्युच्या प्रकरणाचीही आता चर्चा सुरू झाली आहे.

राजकारणात एखाद्याला पद मिळाले की आरोप होत असतात. मात्र, डॉ. मेवालाल हे शिक्षणाने खूप पुढे असले तरीही त्यांच्या एकूण भूतकाळातील आरोपांमुळे ते चर्चेत आलेले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनीही त्यामुळे नितीशकुमार सरकारवर टीका केली आहे.

कृषी विद्यापीठात त्यांनी मोठा नोकर भारती घोटाळा केल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांची पत्नी व माजी आमदार नीता चौधरी यांचा 2019 मध्ये संशयास्पद मृत्यू झालेला आहे. निवृत्त आईपीएस अधिकारी अमिताभ दास यांनी त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्युच्या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीचे पत्र दिले होते. तेही सध्या सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत आहे.

एकूणच यामुळे पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या सरकारचे एकूण कारभार आणि बिहारची राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर देशभरात चर्चा सुरू झालेली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here