म्हणून एलन मस्क बनले जगातील तिसरे श्रीमंत; वाचा, एका दिवसात संपत्तीत कशी झाली ५० हजार कोटींपेक्षा जास्त वाढ

दिल्ली :

स्पेस एक्स आणि टेस्लाचा प्रमुख असलेले एलन मस्क आता जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. काही काळ मस्क काही कारणास्तव चर्चेत राहिलेले आहेत. त्यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. अलीकडेच त्यांच्या रॉकेट कंपनीने अंतराळात चार अंतराळवीर पाठवले आहेत. याशिवाय इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा एसएंडपी 500 कंपनीच्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीमध्ये 185 अब्ज डॉलर्ससह जेफ बेझोस दुसर्‍या क्रमांकावर, 129 अब्ज डॉलर्ससह बिल गेट्स दुसर्‍या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर ११० अब्ज डॉलर्ससह एलन मस्क, १०4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क जुकरबर्ग चौथ्या क्रमांकावर आहेत. आणि बर्नार्ड अर्नाल्ट १०२ अब्ज डॉलर्सची संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहे.

टेस्लाबद्दल आलेल्या बातमीनंतर एका दिवसात एलन मस्कच्या संपत्तीत 7.61 अब्ज डॉलर्स (50 हजार कोटींपेक्षा जास्त) वाढ झाली आहे. आतापर्यंत त्यांची संपत्ती वार्षिक आधारावर 82 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. टॉप -500 बिलिनेयरमध्ये यावर्षी मस्कची संपत्ती सर्वाधिक वाढली आहे. वार्षिक मालमत्ता वाढीच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर जेफ बेझोस आहे. यावर्षी आतापर्यंत त्यांची संपत्ती सुमारे 70 अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here