म्हणून ठराविकच लोक असतात ‘लेफ्टी’; वाचा ‘डावखुरे’ लोक कशा पद्धतीने ठरतात वेगळे

आजवर आपण अनेक डाव्या हाताने लिहिणारे, जेवणारे आणि बहुतांश कामे डाव्याच हाताने करणारे लोक पहिले असतील. आपल्याला नकळत कधीतरी प्रश्न पडतोच की ठराविक लोक डावे का असतात? आणि त्यांना डाव्या हाताचा वापर करताना अनकम्फर्ट वाटत नाही का? असे विविध प्रश्न आपल्या मनात येऊन जातात. डाव्या हाताचा वापर करणाऱ्यांना आपण डावखुरे म्हणतो. आपल्याकडे गंद लावताना, पूजेच्या वेळी, नारळ फोडताना उजव्या हाताचा वापर केला जातो. कारण डाव्या हाताचा वापर करणे आपल्याकडे अशुभ मानले जाते. जगातील जवळपास ८७ टक्के लोक कामांसाठी उजव्या हाताच्या उपयोग करतात उरलेले जवळपास १० टक्के लोक डाव्या हाताचा उपयोग करतात.     

विज्ञानाला शुभ-अशुभ काहीच नसते. विज्ञान फक्त लॉजिक्स, कर्म आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींशी निगडीत असते. म्हणूनच आज आपण डाव्या लोकांविषयी विज्ञानाच्या अंगाने जाणून घेणार आहोत.

सर्वसाधारणपणे माणसाला २ मेंदू असतात. एक म्हणजे उजवा मेंदू आणि दुसरा म्हणजे डावा मेंदू होय. प्रत्यक्षात मेंदूचा डावा भाग शरीराच्या उजव्या भागाला नियंत्रित करत असतो तर मेंदूचा उजवा भाग शरीराच्या डाव्या भागाला नियंत्रित करत असतो. जर आपल्या मेंदूचा डावा भाग जर जास्त प्रमाणात काम करत असेल तर आपल्या शरीराचा उजवा भाग मजबूत म्हणजेच आपण राईटी असण्याची संभावना जास्त असते. उजवा मेंदू हा जास्त सक्रिय असलेले लोक डावे असण्याची संभावना जास्त असते.

लेफ्टी लोकांविषयी अत्यंत महत्वाच्या गोष्टी :-

  1. लेफ्टी लोक राईटी लोकांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात.
  2. लेफ्टी लोकांमध्ये नकारात्मक भावना ह्या थोड्या जास्त प्रमाणात असतात, सोबतच त्यांना राईटी लोकांपेक्षा राग खूप लवकर येतो.
  3. लेफ्टी लोकांना एलर्जी मायग्रेन आणि झोप न येणे या समस्यांना सामारे जावे लागू शकते.
  4. लेफ्टी लोकांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या हि अधिक आहे.
  5. भरपूर तणावात असलेली गर्भवती महिला जास्त करून लेफ्टी बाळाला जन्म देते.
  6. लेफ्टी लोक मल्टीटास्किंग करण्यात राईटी लोकांपेक्षा अधिक चांगले असतात.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here