लॉकडाऊनमध्ये ‘या’ ३ कंपनीच्या सीम वापकर्त्यांमध्ये कोटींनी घट; ‘या’ एकाच कंपनीच्या ग्राहकांमध्ये झाली मोठी वाढ, नफ्यातही दणक्यात वाढ

मुंबई :

कोरोना संकटामुळे लॉकडाउनमध्ये मोबाईलसिम वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 1.7 कोटींनी कमी झाली आहे, असा दावा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) केला आहे. लॉकडाऊनमुळे जेव्हा भीतीची परिस्थिती उद्भवली तेव्हा महानगरांमध्ये राहणारे लाखो कामगार आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांचे स्थलांतर सुरू झाले आणि त्याचा दूरसंचार क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.

मार्च-जूनच्या दुसर्‍या तिमाहीत म्हणजेच 2020 मध्ये या मोबाइलसीम वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली. अंदाज असा होता की काही काळाने परिस्थिती सुधारेल मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही परिस्थिती सुधारलेली नाही. जुलै आणि ऑगस्ट दरम्यान ग्रामीण मोबाइलसीम वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

काउंटरपॉईंट रिसर्चचे उपाध्यक्ष (संशोधन) नील शाह म्हणतात की बहुतेक महानगरांमध्ये मोबाइल ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे, तर ग्रामीण भागात मोबाईल ग्राहकांची संख्या वाढली आहे. जुलै पर्यंत ग्रामीण भागात नवीन वापरकर्त्यांची भर पडली, त्यानंतर ऑगस्टपासून त्यात घट झाली आहे. म्हणजेच जेव्हा लॉकडाऊनमध्ये कामगार आपल्या गावी परत आले, त्यांनी एकतर नवीन सिम घेतली किंवा जुन्या सिमचे रिचार्ज केले नाही.

कोरोना संकटाच्या वेळी रिलायन्स जिओने 1 कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत. मार्च 2020 मध्ये भारतात एकूण जियो वापरकर्त्यांची संख्या 38.7 कोटी होती, तर जून 2020 मध्ये जिओ मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढून 39.7 कोटी झाली. त्याच काळात एअरटेलने या काळात 1.1 कोटी, व्होडाफोन 1.4 कोटी आणि बीएसएनएलचे 1 कोटी ग्राहक गमावले. मोबाइल ग्राहकांच्या बाजारात जिओचा सर्वाधिक वाटा आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here