१० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन्स; वाचा दमदार फिचर्सविषयी

मुंबई :

सध्या आर्थिक संकटाचा काळ असला तरी मोबाईल क्षेत्रात मात्र मोठी उलाढाल झाल्याची पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर लोक खरेदी करण्यास उत्सुक असल्याने अनेक मोठ्या ऑफर्सही दिल्या जात आहेत.  आता सणावारांचा सिझन चालू झाला आहे. हेच लक्षात घेऊन ई़-कॉमर्स वेबसाईट विविध वस्तू उत्पादनावर एकदम तगड्या ऑफर्स देत आहेत.

यानिमित्त चालू सेलमध्ये स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. अशातच स्वस्तात मस्त असा फोन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. अवघ्या १० हजारापेक्षा कमी किमतीतही बेस्ट फोन्स मिळत आहेत.

वाचा स्मार्टफोन आणि फीचर्सविषयी :-

रीयलमी नार्झो 20 a (realme narzo 20 a) :-

 • ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज
 • किंमत ८ हजार ४९९ रुपये
 • ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ४९९ रुपये आहे.
 • ६.५ इंचाचा डिस्प्ले
 • 5000mAh बॅटरी
 • ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, १२ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

moto e7 plus :-

 • ६.५ इंचाचा डिस्प्ले
 • किंमत ९ हजार ४९९ रुपये
 • ऑक्टा कोर प्रोसेसर आणि अँड्रॉयड १०
 • ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज
 • 5000mAh बॅटरी
 • ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरासोबत २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा
 • फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

POCO C3 :-

 • किंमत ७ हजार ४९९ रुपये
 • ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये
 • फोनमध्ये 5000mAh बॅटरी
 • – ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी
 • ६.५३ इंचाचा डिस्प्ले, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा तसेच १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप

infinix hot 10 (1) :-

 • ४ जीबी रॅम फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये
 • ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ऑक्टा कोर प्रोसेसर, 5200mAh बॅटरी
 • ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज
 • फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप

Lg W11 :-

 • किंमत ९ हजार ४९० रुपये
 • ६.५२ इंचाचा डिस्प्ले, ऑक्टा कोर प्रोसेसर
 • फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज
 • 4000mAh बॅटरी
 • रियरवर १३ मेगापिक्सलचे दोन रियर आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here