असा लागला ट्राफिक सिग्नलचा शोध; कसे ठरवले ३ रंग, वाचा रंजक माहिती

दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या नेहमी पाहण्यात, वापरात असतात. त्याविषयी आपल्याला अनेक प्रश्न पडतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण शाळेची बस पहिली असेलच ती नेहमी पिवळी असते. मग ती पिवळ्याच रंगाची का असते असा प्रश्न आपल्याला पडतो.(शाळेची बस पिवळ्या रंगाची याविषयीचा विस्तृत लेख krushirang.comवर वाचा) तसेच ट्राफिक सिग्नलचा शोध कसा लागला आणि त्यासाठी ३ रंगाचा उपयोग का केला गेला, सर्वात आधी ट्राफिक सिग्नलचा वापर कोणत्या देशात आणि कुठे झाला होता?  याविषयी आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

१८६०चा काळ होता. रस्ता ओलांडण्यासाठी कुठलाही नियम नव्हता. कुणी कसेही घुसायचे त्यामुळे अपघात वाढले परिणामी मृत्यूंची संख्याही वाढली. यावर काय उपाय करायचा यावर कुणालाच काहीही सुचत नव्हते. तेव्हा एका इंजिनियरच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ट्राफिक सिग्नलचा शोध लागला.  

जेके नाईट मानक रेल्वे मध्ये एक इंजिनियर असणाऱ्या व्यक्तीने २ रंगांच्या (हिरवा आणि लाल) ट्राफिक सिग्नल तयार केले. तत्कालीन राज्यकर्त्यांना त्याचे महत्व पटले. सगळ्यात आधी १० डिसेंबर १८६८ साली लंडनच्या ब्रिटिश सभागृहाबाहेर पहिल्यांदा ट्राफिक सिग्नल बसवले. हळूहळू ट्राफिक सिग्नलची सांख्य वाढत गेली. बराच काळ फक्त २ रंगाचे ट्राफिक सिग्नल होते. त्याकाळी रात्रीच्या वेळ या सिग्नलचा वापर व्हावा म्हणून त्यांच्या मध्ये गॅसचा वापर केला जाऊ लागला. आणि नंतर काही काळाने या २ रंगांच्या सोबतीला पिवळा रंग जोडला गेला.

३ रंग निवडण्याचे हे होते कारण :-

बाकी रंगांपेक्षा हिरवा, लाल आणि पिवळा रंग आपल्या डोळ्यांना रात्री सुद्धा स्पष्ट दिसतात, पण बाकी रंग आपल्या डोळ्यांना या रंगांएवढे स्पष्ट दिसत नाहीत.

असे आहेत या रंगांचे अर्थ :-

लाल :- लाल रंग धोक्याचे प्रतिक आहे

पिवळा :-  या रंगाला उर्जेचे प्रतिक मानल्या जाते.

हिरवा :- शांतीचे प्रतिक मानल्या जाते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here