म्हणून बुडण्याच्या स्थितीत आली ९४ वर्ष जुनी लक्ष्मी विलास बँक; वाचा, काय आहे प्रकरण

दिल्ली :

बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे आढळून आले होते म्हणून केंद्र सरकारने आरबीआयच्या सल्ल्याने लक्ष्मी विलास बँकेबाबत मोठी कारवाई केली. यावेळी बँकेवर विविध प्रकारचे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. मागच्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत बँकेला 357.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आरबीआयने डीबीएस बँक इंडियासोबत लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणाचा प्लॅन केला आहे. 

बँक मोठ्या कालावधीपासून भांडवली संकटाचा सामना करत होती. यासाठी चांगल्या गुंतवणूकदारांचा शोध घेतला जात होता. आकड्यांनुसार, जून तिमाहीत बँककडे एकूण जमा भांडवल 21,161 कोटी रुपये होते, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात प्रसिद्ध झाली आहे.

का अशी स्थितीत आली ९४ वर्ष जुनी लक्ष्मी विलास बँक:-

  1. – बँकेला 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत 396.99 कोटी रुपयांचा शुद्ध तोटा झाला होता, तर तिचे ग्रोस एनपीए प्रमाण 24.45 टक्के होते.
  2. – क्रेडिट रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्जच्या मागच्या महिन्यात 93 वर्षे जुन्या या प्रायव्हेट बँकेचे रेटिंग कमी केले होते. 
  3. – सातत्याने होत असलेल्या तोट्यामुळे तसेच ईतर कारणांमुळे  बँकेची स्थिती मागील 3 वर्षांपासून खराब आहे.
  4. – क्लिक्स कॅपिटलला देण्यात आलेल्या लोनमध्ये क्लिक्स कॅपिटलने आपल्या लोन बुकचे मूल्य 4200 कोटी रुपये ठेवले होते, तर एलव्हीबीने ते 1,200 रुपयांनी 1,300 कोटी रुपयांचे लिहिले, ज्यामुळे 2,500 ते 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तची मिसमॅचिंग दिसून आली.
  5. – एलव्हीबीची सध्याची समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा तिने रॅनबॅक्सी आणि फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर्स मालविंदर सिंह आणि शिविंदर सिंह यांच्या सुमारे 720 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉजिटवर लक्ष दिले. 2016-17 च्या सुरुवातीला रेलिगेयर फिनवेस्टद्वारे बँकेला 794 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिटसाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. रेलिगेयरने नंतर लोन वसुली करण्यासाठी एफडीचे पैसे वसूल केल्यानंतर एलव्हीबीच्या दिल्ली शाखेवर खटला दाखल करण्यात आला होता आणि हे प्रकरण न्यायालयात आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here