गेल्या २४ तासांत आरबीआयने केली ‘या’ दोन बँकांवर कारवाई; ‘अशा’ प्रकारे घातले बँकेवर निर्बंध

दिल्ली :

२४ तासांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने २ बँकांवर कारवाई केली असून या दोन्हीही बँकांवर निर्बंध घातले आहेत. सुरुवातीला लक्ष्मी विलास बँकेवर कारवाई करण्यात आली तर त्यानंतर अवघ्या २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंत जालना जिल्ह्यामधील मंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करून बँकेवर निर्बंध घालण्यात आले आहे.

सहा महिन्यासाठी विविध निर्बंध घातले असल्याची माहिती आरबीआयकडून मिळाली आहे. बँकांवर घातलेल्या निर्बंधाचा फटका बँकेच्या ग्राहकांनाही बसणार आहे. अर्थ मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने मंगळवारी खासगी क्षेत्रातील बँकेवर काही निर्बंध लादले आहेत. सरकारच्या निर्बंधांमुळे आता बँकेच्या खातेदारांना दररोज २५ हजार इतकीच रक्कम काढता येणार आहे. हे निर्बंध १६ डिसेंबरपर्यंत लागू राहतील.

असे असतील निर्बंध :-

– नवीन ठेवी स्विकारण्यावरही बँकेवर निर्बंध असणार आहेत.

– कोणालाही कर्ज देऊ शकत नाही किंवा बँक कर्ज घेऊही शकत नाही.

– जुन्या कर्जांमध्ये नूतनीकरण करण्यासाठी बँक कुठलीही नवी गुंतवणूक करू शकत नाही.

केंद्र सरकारने आरबीआयच्या सल्ल्याने लक्ष्मी विलास बँकेबाबत ही कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार बँकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे आढळून आले होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here