सावधान : ‘या’ जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची आहे शक्यता; वाचा कोणत्या महिन्यात वाढेल प्रसार

पुणे :

जगभरात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. अमेरिकेत एका दिवशी दीड लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. भारतात कोरोना विषाणूने हाहाकार घातला असून बाधित रुग्णांच्या संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे असले तरीही अद्यापही कोरोनावर अपेक्षित नियंत्रण मिळवता आलेले नाही. दरम्यान येत्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

याचसंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना सावध करत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. महापौर ट्विटमध्ये म्हणतात, ‘आगामी काळात कोरोना संसर्ग वाढू शकतो, ही शक्यता विचारात घेऊन आपण नजीकच्या भविष्यकाळातील नियोजन केले आहे, यंत्रणाही सज्ज आहेत. पण आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचे आहे. सामूहिकपणे लढून हे दुसरं संकट नक्की टाळता येवू शकेल.

व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आलेले आहेत, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here