म्हणून चांगला पाऊस पडूनही कापसाला बसणार जवळपास चारशे कोटींचा फटका; वाचा, काय आहे कारण

अहमदनगर :

सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे कापूस उत्पादकांना अपेक्षित यश कापूस उत्पादनात येत नव्हते. यावर्षी मात्र सुरुवातीला मनाजोगता पाऊस झाल्यामुळे उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागली. मात्र नंतर पाऊस वाढला आणि नगर दक्षिणेच्या कापूस पट्ट्यातील भागाला पावसाने झोडपले परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

खरीप हंगामात नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत भागातील शेतकरी कापसाचे उत्पादन करतात. हळूहळू राहाता, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा भागातही काही प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी वाढले आहेत. चालू वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड झाली. सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली असल्याची माहिती जाणकारांनी सांगितली आहे. मात्र ऐन कापूस वेचणीच्या काळातच दोन महिने जोरदार पाऊस पडला आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानी सामोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार सहा ते सात लाख क्विंटल कापसाचे नुकसान झाले असून त्यामुळे साडेतीनशे ते चारशे कोटींचा फटका बसू शकतो, असे मत तज्ञांनी सांगितले आहे.

जिल्हाभरात सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे ५० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. यंदा पावसाने ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सलग झालेल्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजून काळा पडला, साचलेल्या पाण्याने कपाशी आणि न फुटलेली कापसाची बोंडेही सडली. हा एवढा मोठा फक्त ४०० कोटींचा असून शकतो.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here