सरकार विकत आहे बीपीसीएलमधील संपूर्ण 52.98% हिस्सा; ‘या’ कंपनीने खरेदी करण्यासाठी दाखल केलं अभिरुचीपत्र

दिल्ली :

वेदांता समूहाकडून बुधवारी सांगण्यात आले की भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मधील सरकारी हिस्सा खरेदी करण्यासाठी प्राथमिक अभिरुचीपत्र(ईओआय) दाखल करण्यात आहे. सध्या तेल आणि गॅस व्यवसायाशी ताळमेळ साधल्यामुळे वेदांता समूहाचे लक्ष भारतातील दुसर्‍या क्रमांकावरील इंधन कंपनीकडे गेले आहे. बीपीसीएलमध्ये सरकार आपला संपूर्ण 52.98 टक्के हिस्सा विकत आहे. आणि हा हिस्सा विकत घेण्यासाठी वेदांता समूह इच्छुक आहे.

कंपनीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, “बीपीसीएलसाठी वेदांतचा ईओआय आमच्या सध्याच्या तेल आणि वायू व्यवसायाशी संबंधित संभाव्य मूल्यांकन करेल”. हा हिस्सा खरेदी करण्यासाठी अनेक उद्योग समूह इच्छुक आहेत. अनेकांनी अभिरुचि पत्र दाखल केलेले आहेत मात्र बोली लावणाऱ्यांची नावे, ओळख अद्याप समोर आलेली नाहीत.

बीपीसीएलमधील 52.98 टक्के भागभांडवलाची म्हणजे संपूर्ण हिस्स्याची सरकार विक्री करीत आहे आणि अभिरुचि (ईओआय) भरण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर होती. दरम्यान आता सरकारी हिस्सा कोण खरेदी करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here