370 कलमाबाबत फडणवीस म्हणाले की..; वाचा महत्वाची बातमी

काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर अजूनही त्या भागातीलपरिस्थिती पूर्ववत झालेली नाही. सर्व व्यवहार ठप्प असल्याने तेथील जनतेमध्ये आणि राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशावेळी राजकीय पक्ष एकत्रित येऊन याच्या विरोधात आघाडी करीत आहेत. त्यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेस पक्ष देश तोडण्यासाठीचे काम करीत असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी कलम 370 याबाबत पक्षाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

त्यांनी म्हटले आहेक की, काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा लागू होणार नाही. रतविरोधी शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांसोबत हातमिळवणी करुन तिथे पुन्हा एकदा कलम 370 लागू झाला पाहिजे, अशाप्रकारचा प्रयत्न करत आहेत. तिथे पुन्हा कलम 370 लागू व्हावी, यासाठी तेथील अनेक पक्ष एकत्र आले आहे. या गुपकर आघाडीत काँग्रेसदेखील सहभागी झाली आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here