‘अशा’ प्रकारे फ्लिपकार्ट, फोनपेच्या साथीने वालमार्टने कमावले 2.2 लाख कोटी रुपये; वाचा, काय आहे विषय

दिल्ली :

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज आणि आघाडीची कंपनी वॉलमार्टची आंतरराष्ट्रीय व्यापार विक्रीत 1.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 31 ऑक्टोबर रोजी संपलेल्या तिमाहीत वॉलमार्टने 2.2 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली. वॉलमार्टच्या या यशाचा सर्वात मोठा हात म्हणजे फ्लिपकार्ट आणि फोनपेचा होता. या महिन्यांमध्ये मंथली एक्टिव यूजर्सची संख्या सध्या विक्रमी उंचीवर आहे.

वॉलमार्टने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करंसीत झालेल्या बदलाकडे दुर्लक्ष करता ऑक्टोबर तिमाहीत त्यांची विक्री २.२ लाख कोटीऐवजी  2.3 लाख कोटी रुपये (3060 करोड़ डॉलर्स) झाली. टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर विक्रीत पाच टक्के वाढ झाली आहे. चलनात बदल म्हणजे एका चलनातून दुसर्‍या चलनात बदल झाल्याने अंतिम मूल्यावर परिणाम होतो.

वॉलमार्टच्या म्हणण्यानुसार त्यांची सर्वाधिक विक्री फ्लिपकार्ट, कॅनडा आणि वाल्मेक्स येथून झाली. ऑक्टोबरच्या तिमाहीत फ्लिपकार्ट आणि फोनपीवर मंथली एक्टिव यूजर्सची संख्या विक्रमी उंचीवर होती. वॉलमार्ट चीफ फायनान्शियल ऑफिसर (सीएफओ) ब्रेट एम बिग्स यांच्या म्हणण्यानुसार कोरोना या साथीच्या रोगामुळे लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी पर्याय निवडला. यामुळे ऑक्टोबरच्या ‘बिग बिलियन डे’ ची विक्री फ्लिपकार्टसाठी आतापर्यंत सर्वोत्कृष्ट होती. 

वॉलमार्टने 2018 मध्ये भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकोर्टमध्ये बहुसंख्य हिस्सा खरेदी केला. हा करार 1.2 लाख कोटी (1600 कोटी डॉलर्स) होता. या वर्षाच्या सुरूवातीस, वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये 8.9 हजार कोटी (120 कोटी डॉलर्स) ची गुंतवणूक केली आणि त्याचे वैल्युएशन 1.9 लाख कोटी (2490 कोटी डॉलर्स) पर्यंत पोहोचले.

फ्लिपकार्ट बर्‍याच कंपन्यांमध्ये आपली निरंतर गुंतवणूक वाढवत आहे. फ्लिपकार्ट समूहाने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल) मध्ये 1500 कोटी आणि अरविंद यूथ ब्रँडमध्ये 260 कोटींची गुंतवणूक केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here