आत्मनिर्भर भारतात चीनी मोबाईलाच पसंती; 132 टक्के ग्रोथसह ‘ती’ कंपनी आहे टॉपवर

भारत-चीन सीमावाद जोरात सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही घोषणाही दिली आहे. अशावेळी देशभरात स्वदेशी चळवळ पुन्हा जोमाने वाढत असल्याचे सोशल मिडीयामध्ये दिसत असतानाच चीनी मोबाईल कंपन्या देशात वेगाने फोफावत आहेत.

भारतात दसरा ते दिवाळी असा सणासुदीचा काळ म्हणजे खरेदीचा सुकाळ. यंदा अशावेळीही किराणा, कपडे आणि इतर आवश्यक वस्तूंच्या बाजारात तितकी चांगली परिस्थिती नव्हती. सर्व दुकानदार आणि व्यावसायिक या क्षेत्रात यंदा किमान 40 टक्के कमी उलाढाल झाल्याचे सांगतात. त्याचवेळी मोबाईल खरेदीत मात्र भारत कुठेही पाठीमागे नसल्याचे परस्परविरोधी चित्र आहे.

होय, चीनी मोबाईल कंपन्यांनी यंदाही दणक्यात बिजनेस केला आहे. ओप्पो या मोबाईल कंपनीतून बाहेर पडून वेगळे दुकान थाटून व्यवसाय करणाऱ्या रिअलमी Realme कंपनीने याही सणासुदीच्या काळात मागील तिमाहीच्या तुलनेत तब्बल 132 टक्के वाढ नोंदवली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा करोनामुळे मार्केट मंद असतानाही या कंपनीने 22 टक्के इतक्या दमदार वाढीसह फ़क़्त 45 दिवसात 63 लाख स्मार्ट फोन विकले आहेत. मोबाईलसह एकूण 83 लाख डिवाइसेज या कालावधीत विकून कंपनीने आपले टॉपर स्थान आणखी पक्के केले आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here