तर SENSEX जाईल 50 हजारांवर; पहा काय म्हटलेय मॉर्गन स्टैनले यांनी

करोना विषाणूची साथ आल्यावर काही दिवसांसाठी आपटलेल्या शेअर बाजाराने पुन्हा एकदा मोठी उभार घेतली आहे. त्याचवेळी बाजार करेक्शन किंवा थेट नवा उच्चांक होण्याच्या बातम्याही येऊन धडकत आहेत. मॉर्गन स्टैनले यांनी तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स थेट 50 हजारांवर जाण्याचे भाकीत केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, पुढील वर्षामध्ये बड्या कंपन्यांच्या तुलनेत मध्यम आणि छोट्या कंपन्यांची ग्रोथ जोरदार असेल. त्याचवेळी बाजारात खरेदीचा उत्साह असल्याने सेन्सेक्स मोठी झेप घेईल. अगदी पुढील वर्षीच्या पहिल्याच तिमाहीत म्हणजे जून 2021 ला किंवा नंतर शेअर बाजाराचा हा सूचकांक उच्चांकावर जाईल असा मॉर्गन स्टैनले यांना विश्वास वाटत आहे.

37000 ते 59000 या स्तरावर पुढील आर्थिक वर्षात मार्केटचा सूचकांक खेळत राहील. वाढीचा मोठा स्कोप असतानाच जर त्यावेळी काही कारणाने मार्केट पडले तर कमीतकमी 37000 या स्तरावर तरी मार्केट असेल, असेच त्यांनी म्हटले आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

ता. क. : आपल्याकडे कोणतीही ठोस कल्पना असेल तर आम्ही त्याला साकार करू. कंपनी नोंदणी, ट्रेडमार्क, तंत्रज्ञान सल्ला आणि उद्योग मार्गदर्शन यासाठी आम्हाला ९४२२२१५६५८ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. (सल्ला व मार्गदर्शन मोफत नसेल. तसेच कोणता उद्योग करावा यासाठी सल्ला मागायला अजिबात फोन करू नये. व्यवसाय आपण निवडावा. आपली बौद्धिक व आर्थिक क्षमता आणि जोखीम पत्करण्याची तयारी यानुसार व्यवसाय निवडावा. आम्ही त्यासाठीचे तांत्रिक मार्गदर्शन करू.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here